ख्रिस्ती बनल्यास १५ सहस्र रुपये आणि ‘सुंदर मुली’शी विवाहाचे आमीष दाखवून हिंदूचे धर्मांतर !

सर्वेंद्र विक्रम सिंह यांनी तक्रारीत, ‘प्रलोभनांनंतर मी त्याला बळी पडलो. मी धर्मांतर केल्यास केवळ पैसेच नव्हे, तर मला अनेक भेटवस्तूही मिळणार असल्याचे पाद्य्राने सांगितले’, असे म्हटले आहे.

गावगुंडांचा नायनाट करू ! – नागपूरमधील रणरागिणींची पोलिसांना चेतावणी

‘पोलीस ठाण्याच्या इतक्या जवळ घडणारे गुन्हे न दिसणारे पालीस आंधळे आहेत का ? गावगुंडांवर कठोर कारवाई न करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करा !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री सनातन धर्माविषयी बोलत असल्याने त्यांच्यावर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत ! – भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी चमत्कार सिद्ध करून दाखवावेत असे आव्हान शाम मानव यांनी त्यांना दिले आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

छत्तीसगडमध्ये १ सहस्र १०० ख्रिस्ती मूळ हिंदु धर्मात परतले !

भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी गंगेच्या पाण्याने पाय धुवून सर्वांना हिंदु धर्मात परत आणले.

 चीनकडून भारताच्या विरोधात जलयुद्धाची सिद्धता !

चीनचे हे धोकादायक मनसुबे लक्षात घेऊन भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !

संयुक्त राष्ट्रांच्या पदाधिकार्‍यांनी तालिबानच्या झेंड्यासह काढली छायाचित्रे

संयुक्त राष्ट्रांकडून क्षमायाचना

भारतीय कुस्तीपटूंचे देहलीतील आंदोलन मागे

भारतीय कुस्तीपटूंचे गेल्या ३ दिवसांपासून चालू असलेले जंतरमंतरवरील आंदोलन २० जानेवारीच्या मध्यरात्री मागे घेण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी ही घोषणा केली.

जम्मूमधील २ बाँबस्फोटांत ५ जण घायाळ !

कितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जम्मू-काश्मीरमधील अशा घटना थांबतांना दिसत नाहीत; त्याचे कारण म्हणजे या आतंकवादामागे असलेला पाकिस्तान आणि त्याची जिहादी मानसिकता ! या दोघांना नष्ट केल्यानंतरच काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट होईल !

पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांवर आरोपपत्र प्रविष्ट !

कर्नाटकातील भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेत्तारू यांची २६ जुलै २०२२ या दिवशी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या २० कार्यकर्त्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.

अल्पवयीन मुलांना गर्भनिरोधक न विकण्याचा आदेश कर्नाटक सरकारकडून मागे !

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या दफ्तरामध्ये गर्भनिरोधक, सिगरेट आणि ‘व्हाईटनर’ सापडल्यानंतर औषध नियंत्रण विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले होते.