गुन्हा नोंदवण्यास पोलिसांचा नकार
मुंबई – घाटकोपर येथील चिरागनगर येथे ४ दिवसांपूर्वी एका मुसलमान युवकाने येथील एका हिंदु युवतीला पळवून नेले. युवतीच्या पालकांनी चिरागनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली; मात्र प्रारंभी पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिला. ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणामुळे प्रक्षुब्ध हिंदुत्वनिष्ठांनी कारवाईची मागणी केल्यानंतर १९ नोव्हेंबर या दिवशी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
ज्या मुसलमान युवकाने हिंदु युवतीला पळवून नेले, तो गुंड प्रवृत्तीचा आणि व्यसनी असल्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने पळवून नेलेल्या युवतीच्या आईला युवतीची अश्लील छायाचित्रे दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याची माहितीही तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली. मागील ४ दिवसांपासून हिंदु युवती आणि मुसलमान युवक बेपत्ता आहे. जोपर्यंत तिचा शोध घेतला जात नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हटणार नाही, अशी भूमिका हिंदुत्वनिष्ठांनी घेतली आहे. शेवटी विलंबाने या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
BJP Leader @KiritSomaiya Warns of Protest in ‘Love Jih@d’ case if action isn’t taken against the Mu$l!m youth! 🚨🚨✊
📍Ghatkopar #Maharashtra
Why is such a warning necessary?
Shouldn’t the police take action on their own? 🤔🤔#SaveHinduGirls pic.twitter.com/u3pJHl3e6e https://t.co/MRzjBIGuED
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 25, 2024
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकणे आवश्यक ! |