Madras HC On MS Subbulakshmi Award : एम्.एस्. सुब्‍बुलक्ष्मी यांच्‍या नावावरून संगीत अकादमीला पुरस्‍कार देण्‍यास मद्रास उच्‍च न्‍यायालयाची बंदी

प्रसिद्ध कर्नाटक गायिका एम्.एस. सुब्‍बुलक्ष्मी व संगीतकार टी.एम्. कृष्‍णा

चेन्‍नई (तमिळनाडू) – मद्रास उच्‍च न्‍यायालयाने मद्रास संगीत अकादमीला सहकारी संगीतकार टी.एम्. कृष्‍णा यांच्‍या पुरस्‍कारासाठी प्रसिद्ध कर्नाटक गायिका एम्.एस. सुब्‍बुलक्ष्मी यांचे नाव वापरण्‍यास मनाई केली.तसेच त्‍यांच्‍या नावावर कोणताही पुरस्‍कार, विश्‍वस्‍त किंवा स्‍मारक सिद्ध करण्‍यास स्‍पष्‍टपणे मनाई केली आहे. सुब्‍बुलक्ष्मी यांचे नातू व्‍ही. श्रीनिवासन् यांनी प्रविष्‍ट (दाखल) केलेल्‍या याचिकेवर न्‍यायमूर्ती जी. जयचंद्रन् यांनी हा आदेश दिला. श्रीनिवासन् यांनी एम्.एस्. सुब्‍बुलक्ष्मी पुरस्‍कारासाठी त्‍यांच्‍या आजीचे नाव वापरण्‍यास विरोध केला होता. श्रीनिवासन् यांनी आरोप केला आहे की, टी.एम्. कृष्‍णा यांनी सामाजिक माध्‍यमांतून सुब्‍बुलक्ष्मी यांच्‍याबद्दल अपमानास्‍पद टिपणी केली होती.

न्‍यायालयाने म्‍हटले की, सुब्‍बुलक्ष्मीबद्दलचा खरा आदर त्‍यांच्‍या नावाने पुरस्‍कार स्‍थापन करण्‍याऐवजी त्‍यांनी व्‍यक्‍त केलेल्‍या इच्‍छांचा सन्‍मान करणे असेल. अकादमी टी.एम्. कृष्‍णा यांच्‍यासारख्‍या कलाकारांचा सन्‍मान करणे चालू ठेवू शकते; परंतु अशी कोणतीही मान्‍यता सुब्‍बुलक्ष्मीच्‍या नावाशी जोडली जाऊ नये.