‘फायझर’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून कोरोनावरील कुचकामी लसीशी संबंधित प्रश्‍नांकडे दुर्लक्ष  !

फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबर्ट बोर्ला (उजवीकडे)

दावोस (स्विट्झरलँड)  – अमेरिकास्थित औषध आस्थापन फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबर्ट बोर्ला यांनी फायझर कोरोना लसीच्या परिणामकारकतेशी संबंधित प्रश्‍नांकडे वारंवार दुर्लक्ष केले. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित होत आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीत अलबर्ट बोर्ला यांना अप्रभावी कोरोना लसीविषयी अनेक प्रश्‍न विचारण्यात आले; परंतु त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. यासह पत्रकारांनीही या लसीच्या गुणवत्तेविषयी प्रश्‍न विचारले असता अलबर्ट बोर्ला यांनी ‘धन्यवाद आणि शुभ दिवस’ असे म्हणत प्रश्‍नांना सोयीस्करपणे बगल दिली.

राहुल गांधी, पी चिदंबरम् आणि जयराम रमेश हे विदेशी लसींना भारतात प्रोत्साहन देत होते ! – केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दावोसमधील फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबर्ट बोर्ला यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये त्यांनी ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पी चिदंबरम्  आणि जयराम रमेश हे तिघेही विदेशी लसींना भारतात प्रोत्साहन देत होते’, असा आरोप केला आहे.