मुंबई – मुंबादेवी मतदारसंघात जिवंत मतदाराला मृत घोषित करण्यात आले. गोव्याहून विशेष मतदानासाठी आलेले अँथोनी ब्रिगेन्झा यांच्या नावापुढे ते मृत असल्याचे दाखवण्यात आले होते; मात्र शेवटी वादानंतर त्यांना मतदान करण्याची अनुमती मिळाली. मुंबादेवी मतदारसंघातील मुंबई सेंट्रल येथील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली.
मुंबई सेंट्रलच्या बीआयटी चाळीत रहाणारे अँथोनी ब्रिगेन्झा हे मतदान केंद्रावर गेले होते; पण त्यांना मृत दाखवण्यात आल्याचे पहाताच ब्रिगेन्झा यांना प्रचंड धक्का बसला. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास कुणीही सिद्ध नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी मतदान केले होते. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी त्यांना साहाय्य करून त्यांची कागदपत्रे दाखवली. त्यानंतर निवडणूक अधिकार्यांची निश्चिती पटली. त्यानंतर ब्रिगेन्झा यांना मतदान करता आले.
संपादकीय भूमिकाहा आहे प्रशासनाचा भोंगळ कारभार ! |