|
मुंबई – महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी दुपारी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झाले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेविषयी कोणताही गंभीर प्रश्न उद़्भवला नसला, तरी काही अनुचित घटना घडल्या. राजकीय पक्षांच्या बूथवर पैशांचे वाटप झाल्याच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या. यामुळे या निवडणुकीला गालबोट लागले.
१. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत १८.४४ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान झाले.
२. दुपारी ३ वाजल्यानंतर सायंकाळच्या वेळेत राज्यातील अनेक मतदारसंघांत मतदारांनी गर्दी केली. त्यामुळे अनेक ठिकाणी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आलेल्या मतदारांचे मतदान उशिरापर्यंत घेण्यात आले.
३. जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सहकुटुंबासह सकाळच्या वेळेत मतदान केले.