पेठवडगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरी पार पडली !

पेठवडगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) – हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने २२ जानेवारी  या दिवशी वडगाव विद्यालय वडगाव ज्‍युनिअर कॉलेज येथे सायंकाळी ६ वाजता हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा आयोजित करण्‍यात आली आहे. या सभेच्‍या प्रचारासाठी २० जानेवारीला शहरात वाहनफेरी काढण्‍यात आली. या फेरीसाठी ६५ दुचाकी आणि १३० धर्मप्रेमी सहभागी झाले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘आर्ट ऑफ लिव्‍हिंग’चे श्री. राजेंद्र जाधव आणि त्‍यांच्‍या पत्नी यांनी धर्मध्‍वजाचे पूजन केले. पूजनाचे पौरोहित्‍य श्री. गिरीश देशपांडे यांनी केले. यानंतर शहरातील विविध मार्गांवर जाऊन शिवतीर्थमार्गे महापालिका चौक येथे फेरीचा समारोप झाला.

पेठवडगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीत सहभागी दुचाकी
पेठवडगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीत सहभागी दुचाकी

फेरीच्‍या समारोपप्रसंगी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे धारकरी श्री. धनंजय गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधाकर पिसे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले. या प्रसंगी बजरंग दलाचे श्री. किरण पुरोहित आणि श्री. किरण कोळी, शिवसेनेचे श्री. अंकुश माने आणि श्री. अनिल माने, श्री. मनोहर काटकर, श्री. वैभव हिरवे, श्री. धनाजी सलगर आणि श्री. विशाल सणगर, श्री. राजेंद्र बुरुड यांसह हिंदु धर्मप्रेमी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

वाहनफेरीत सहभागी दुचाकी

हिंदु बांधवांनो हिंदु राष्ट्र स्थापनेतील आपली भुमिका समजुन घेण्यासाठी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! – श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा
• रविवार, २२ जानेवारी २०२३
• सायंकाळी ६:०० वाजता.
• वडगाव हायस्कूल चे मैदान, पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
• संपर्क क्रमांक:- ९४२०७२२६३२

हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर.


क्षणचित्रे

१. कु. अरव कुडाळकर (वय १० वर्षे) हा पूर्णवेळ सायकलरून फेरीत सहभागी झाला होता.

२. एक दुकानदार श्री. रमेश माळवदे यांना फेरीचा विषय सांगितल्‍यावर त्‍यांनी मुंबई येथे जाण्‍याचे नियोजन रहित करून फेरीत सहभाग घेतला, तसेच त्‍यांनी ५० भगवे ध्‍वज अर्पण केले.