नथुराम गोडसे यांना खलनायक ठरवल्यास चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडू !

‘गांधी गोडसे – एक युद्ध’ चित्रपटाच्या विरोधात हिंदु महासभेची चेतावणी

मुंबई – ‘गांधी गोडसे – एक युद्ध’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारी या दिवशी प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे ‘प्रमोशन’ चालू आहे. मुंबईत चित्रपटाचे प्रमोशन चालू असतांना ‘अमर हुतात्मा हिंदु महासभे’ने निर्मात्यांना काळे झेंडे दाखवून विरोध प्रदर्शित केला. ‘या चित्रपटात नथुराम गोडसे यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्यास चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडण्यात येईल’, अशी चेतावणी अमर हुतात्मा हिंदु महासभेने दिला होता.