मारेगाव (यवतमाळ) येथील घटना !
मारेगाव (यवतमाळ), २० जानेवारी (वार्ता.) – परवानाधारक दारूच्या दुकानाच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी ९० सहस्र रुपयांची लाच घेतांना नगरपंचायत नगरसेवकाला यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. अनिल उत्तमराव गेडाम असे लाच स्वीकारणार्या नगरसेवकाचे नाव आहे. (असे भ्रष्ट लोकप्रतिनिधी काय कामाचे ? – संपादक)
गेडाम यांनी परवाना असलेल्या किरकोळ देशीदारू दुकानाविरुद्ध तक्रार केली होती; पण तक्रार मागे घेण्यासाठी गेडाम यांनी दुकानदाराकडे ९० सहस्र रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून ९० सहस्र रुपयांची लाच घेतांना गेडाम यांना पकडण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचारग्रस्त महाराष्ट्र ! |