इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये सातत्याने आतंकवादी घटना चालूच आहेत. पाकिस्तानच्या वायव्य सीमेवर असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू येथे झालेल्या ताज्या आत्मघातकी आक्रमणात पाकिस्तानी सैन्यदलाचे १० सैनिक ठार झाले आहेत. या आत्मघातकी आक्रमणात एका आतंकवाद्याने त्याच्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा सैन्यदलाच्या चौकीजवळ स्फोट घडवून आणला. एक दिवसापूर्वी याच भागात झालेल्या आणखी एका आतंकवादी आक्रमणात पाकिस्तानी सैन्यदलाचे ८ सैनिक ठार झाले होते.
Suicide Attack in Pakistan
A devastating suicide attack has struck Pakistan Army in northwest Pakistan, claiming the lives of 10 soldiers and injuring several others pic.twitter.com/kATKE2VjQW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 20, 2024
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्मघातकी स्फोटामुळे माली खेल चौकीसह सैन्यदलाच्या अनेक वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. ‘हाफिज गुल बहादूर’ या सशस्त्र गटाने आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. काल याच ठिकाणी झालेल्या आतंकवादी आक्रमणात पाकिस्तानी सैन्यदलाचे ८ सैनिक ठार झाले होते. त्याचे दायित्व ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेने स्वीकारले होते.