कटिहार (बिहार) येथे ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक !

दगडफेकीची चौथी घटना

कटिहार (बिहार) – येथे ‘वन्दे भारत’ एक्सप्रेस रेल्वेगाडीवर दगडफेक करण्यात आली. यामुळे गाडीच्या एका डब्याची काच फुटली. ही गाडी न्यू जलपाईगुडीहून हावड्याला जात होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. या मार्गावरील या गाडीला प्रारंभ होऊन केवळ २१ दिवस झाले आहेत; मात्र यावर आतापर्यंत ४ वेळा दगडफेक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

सरकारी संपत्तीची अशा प्रकारे हानी करणार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्याची आवश्यकता आहे !