सुरतमधील व्यापार्‍याला पुण्यात पिस्तुलासह अटक !

पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावर ही कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी विनापरवाना पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे यांच्यासह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘पठाण’ चित्रपटाला विरोध !

२४ जानेवारी या दिवशी सातारा शहरातील ‘राजलक्ष्मी’ आणि ‘सेव्हनस्टार’ चित्रपटगृह व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, तसेच भाजप आणि भाजपप्रणित व्यापारी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नव्या रथातून होणार करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची नगर प्रदक्षिणा !

गेल्या दीड मासापासून हा रथ बनवण्याचे काम चालू असून या रथासाठी कर्नाटकातील भाविकाने १२ लाख रुपयांचे सागवानी लाकूड अर्पण केले आहे. यंदा चैत्र यात्रेनंतर ६ एप्रिलला होणारा देवीचा रथोत्सव हा नव्या रथातून साजरा केला जाणार आहे.

नांदेड येथे कार्यालय प्रमुख आणि तक्रारदार यांची समोरासमोर सुनावणी !

प्रत्यक्ष कार्यालय प्रमुख आणि अर्जदार यांची समोरासमोर सुनावणी घेत तक्रारींचा तात्काळ निपटारा केला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांचे कौतुकही होत आहे.

पोतले (तालुका कराड) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा पार पडली !

या सभेत लव्‍ह जिहाद, हलाल जिहाद या विषयांवर समितीच्‍या सौ. रूपा महाडिक यांनी उपस्‍थितांना विस्‍तृतपणे मार्गदर्शन केले.

‘उडाण’ अंतर्गत मिरज येथील कवलापूरमध्‍येच विमानतळ करा ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

मिरज तालुक्‍यातील कवलापूर येथे विमानतळासाठी १६० एकर जागा आरक्षित आहे. या जागेवर पूर्वी धावपट्टी होती. कवलापूर येथे विमानतळाच्‍या जागेसाठी आरक्षण झाल्‍यास जिल्‍ह्याच्‍या कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

‘महावितरण’च्‍या पुणे परिमंडळामध्‍ये वर्षभरात ५३ नागरिकांचा विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यू

तुटलेल्‍या तारा, पडलेले खांब हटवण्‍याचा प्रयत्न करणे, ‘स्‍वीच बोर्ड’ आणि वायर स्‍वत:च दुरुस्‍त करणे, ओल्‍या लाकडी काठ्या किंवा लोखंडाने तारांना स्‍पर्श करणे आदी कारणांनी अपघात झाल्‍याचे समोर येत आहे.

नाशिक येथे भरदिवसा चोर्‍यांमुळे नागरिक भयभीत !

बंद दाराला कुलूप, मळ्‍याची वस्‍ती, शेतकरी कुटुंब आजूबाजूला कुणाची घरे नाहीत, हे पाहून भरदिवसा चोरी करण्‍याच्‍या घटनांमध्‍ये वाढ झाली आहे.  जिल्‍ह्यातील सिन्‍नर तालुक्‍यात अशा चोरीच्‍या घटना वारंवार समोर येत आहेत.

अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्‍या शासनकर्त्यांमुळे देशाचे वाटोळे झाले आहे !

‘अध्यात्म सोडून एक तरी विषय ‘सात्त्विक, सज्जन, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी कसे व्हायचे’, हे शिकवतो का ? तसे नसतांना अध्यात्म सोडून अन्य सर्व विषय शिकवणार्‍या स्वातंत्र्यापासूनच्या ७५ वर्षांतील भारतातील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी देशाचे वाटोळे केले आहे.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले