नाशिक येथे भरदिवसा चोर्‍यांमुळे नागरिक भयभीत !

नाशिक – बंद दाराला कुलूप, मळ्‍याची वस्‍ती, शेतकरी कुटुंब आजूबाजूला कुणाची घरे नाहीत, हे पाहून भरदिवसा चोरी करण्‍याच्‍या घटनांमध्‍ये वाढ झाली आहे.  जिल्‍ह्यातील सिन्‍नर तालुक्‍यात अशा चोरीच्‍या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेष म्‍हणजे या चोरी करण्‍यामध्‍ये पुरुषांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

गेल्‍या आठवड्यापासून चोरट्यांनी तेथे उच्‍छाद मांडला आहे. कांद्याची लागवड चालू असल्‍याने शेतकरी त्‍यात व्‍यस्‍त असतात. तीच संधी पाहून चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात दरोड्याचे सत्र चालू होते. तोच मागील आठवड्यापासून चोरी वाढली आहे.

संपादकीय भूमिका 

असुरक्षित नाशिक !