नागपूर विद्यापिठात ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरी विद्यालया’ची ‘मन व्यवस्थापना’च्या अभ्यासक्रमासाठी निवड !

विद्यापिठाच्या इतिहास विभागाने ‘मन व्यवस्थापन’ या विषयावर १० दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केला आहे. यासाठी ५० रुपये भरून विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे

दाट धुक्यामुळे भारतीय सैनिकाने सीमा ओलांडल्याने पाकच्या सैन्याने पकडले !

पाकचे सैनिक त्याला भारताकडे सोपवण्यास सिद्ध नाहीत. काही दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली होती. तेव्हा पाकच्या सैन्याने त्या भारतीय सैनिकाला सोडले होते.

नाशिक येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाच घेतांना अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महावितरण विभाग !

नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत साहित्याची फेकाफेक, ध्वनीक्षेपक आणि बाके यांची तोडफोड !

साहित्याची फेकाफेकी आणि तोडफोड करणार्‍या सदस्यांना बडतर्फ करून कायमचे घरी पाठवा. विकासकामे करण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिले आहे, याचा विसर सदस्यांना पडला आहे का ?

महाड येथे हत्या करण्यासाठी आणलेल्या १४ गोवंशियांची सुटका, ३ धर्मांधांना अटक

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोरपणे कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध वारंवार हे गुन्हे करत आहेत. कर्तव्यचुकार पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई केली, तरच याला आळा बसेल !

नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय !

खाटा वाढवल्यानंतर नियमानुसार मनुष्यबळही वाढवायला हवे होते; मात्र कर्मचार्‍यांची रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरली गेली नाहीत.

मुंबईत उर्दू शाळांनी मराठी पटसंख्येला टाकले मागे, पटसंख्येत मराठी शाळा ४ थ्या क्रमांकावर !

सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांची भयावह स्थिती उघड होत आहे. मराठी शाळांतील विद्यार्थी इंग्रजी माध्यमाकडे वळण्याचे प्रमाण अधिक आहे.

साधनेच्या अभावापायी सर्वत्र दुराचार पसरला !

‘शालेय शिक्षणात जीवनात सर्वांत उपयुक्त असा विषय, म्हणजे साधना शिकवत नाहीत, तर इतर सर्व विषय शिकवतात. त्यामुळे समाजात सर्वत्र दुराचार पसरला आहे. याउलट हिंदु राष्ट्रात धर्मशिक्षण असल्यामुळे एकही गुन्हेगार नसेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव (कर्नाटक) येथे ४६ ठिकाणी स्मारकाची स्वच्छता आणि पूजनाचा कार्यक्रम !

या उपक्रमाचे आयोजन हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते. ८०० हून अधिक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.

सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा ५२ वा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा !

सप्तर्षींच्या आज्ञेने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी दैवी प्रवास करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा यंदाचा ५२ वा वाढदिवस सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात एका अनौपचारिक भावसोहळ्याद्वारे साजरा करण्यात आला.