हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा उपक्रम !

मुंबई – ‘शिवप्रतापदिन म्हणजे स्वराज्यावर आलेले अफझलखानरूपी मोठे संकट मोडून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्याने केलेला पराक्रम !’ आज पुन्हा एकदा सर्व हिंदूंमध्ये शौर्याची जागृती व्हावी आणि हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे, यांसाठी शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते. महाराष्ट्र, गोवा राज्य, तसेच बेळगाव (कर्नाटक) अशा एकूण ४६ ठिकाणी स्मारकाची सामूहिक स्वच्छता आणि पूजन करण्यात आले. या उपक्रमात ८०० हून अधिक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.
महाराष्ट्रात रायगडमध्ये १, पुणे येथे २, सातारा येथे ३, सोलापुरात १, कोल्हापूर येथे ६, रत्नागिरी येथे ४, सिंधुदुर्गमध्ये ११, नाशिकमध्ये २, धुळे येथे ३, जळगावमध्ये ६, अमरावतीत २, गोवा राज्यात १ आणि बेळगाव (कर्नाटक) येथे ४ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची स्वच्छता, तसेच प्रतिमा पूजन करण्यात आले.





क्षणचित्रे
१. रत्नागिरी येथे २ ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी करण्यात आली.
२. कोल्हापूर
अ. बेलेवाडी (गडहिंग्लज) – कार्यक्रम आवडला. पुढील वेळी आधी कळवल्यास मोठ्या प्रमाणात अशा कार्यक्रमाचे आयोजन करता येईल.
आ. पट्टणकुडी (निपाणी) – अल्प वेळेत हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी नियोजन केले.
३. धुळे
अ. स्मारक स्वच्छता आणि पूजन यांसाठी हिंदु जनजागृती समिती समवेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनीही सहभाग घेतला.
४. सिंधुदुर्ग
अ. हरकुळ खुर्द (मोहूळ) येथे कार्यक्रमाला उपस्थित असणार्या एका महिलेने व्याख्यानाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. त्या गावातील युवती आणि महिला यांना एकत्रित करणार आहेत.
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक