दाट धुक्यामुळे भारतीय सैनिकाने सीमा ओलांडल्याने पाकच्या सैन्याने पकडले !

आठवड्याभरातील दुसरी घटना !

फिरोजपूर (पंजाब) – येथील अबोहर भागात सीमा सुरक्षा दलाचा सैनिक दाट धुक्यामुळे पाकच्या सीमेमध्ये गेल्याने त्याला पाकच्या सैन्याने पकडले. पाकचे सैनिक त्याला भारताकडे सोपवण्यास सिद्ध नाहीत. काही दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली होती. तेव्हा पाकच्या सैन्याने त्या भारतीय सैनिकाला सोडले होते.

येथील सीमेवर भारतीय सैनिक नेहमीची गस्त घालतात. या वेळी इतके धुके होते की, या सैनिकाने शून्य रेषा ओलांडली आणि अन्य सैनिकांना तो बेपत्ता झाल्याचेही लक्षात आले नाही. काही वेळाने ते एकत्र जमले असता एक सैनिक बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर तो पाकच्या सीमेमध्ये गेल्याने पाकच्या सैनिकाने त्याला पकडल्याचे त्यांना समजले.