नाशिक येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाच घेतांना अटक !

 

नाशिक – तक्रारदाराच्या एका इमारतीच्या जागेवर ४१ ट्रान्सफॉर्मर बसवणे, तसेच प्रत्येक इलेक्ट्रिक मीटरची जोडणी देणे यांसाठी महावितरण विभागाच्या द्वारका परिसरातील उपविभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय घालपे यांना १७ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ डिसेंबर या दिवशी अटक केली. इमारती साईटवर वीज मीटर ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामास संमती देण्याचे अधिकार घालपे यांच्याकडे होते. घालपे यांनी ५०० रुपये प्रति मीटरप्रमाणे  ४१ मीटरचे २० सहस्र ५०० रुपये लाच देण्याची मागणी केली होती; मात्र तडजोडीअंती ही रक्कम १७ सहस्र रुपये करण्यात करून तक्रारदाराने त्यांच्याविषयी तक्रार केली.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचाराने पोखरलेला महावितरण विभाग !