प्रतापगडाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गडदुर्ग इस्लामी अतिक्रमणांपासून मुक्त करावेत ! – नितीन शिंदे, माजी आमदार आणि निमंत्रक, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन

सरकारने अन्य गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे आणि सर्व गडदुर्गांना गतवैभव प्राप्त करून द्यावे.

ऑक्टोबर मासात खासगी बसगाड्यांकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने १ लाख ८६ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला !

दीपावलीच्या कालावधीत खासगी बसगाड्यांकडून भाडेवाढीच्या निमित्ताने जी लूट होते, त्याची तक्रार नोंदवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला होता. या क्रमांकावर ‘शून्य’ तक्रारी नोंद झाल्या, असे कार्यालयातील संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचा मंत्रालयावर मोर्चा !

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अश्लील शिवी दिली होती. याच्या निषेधार्थ १५ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला.

खासदार नवनीत राणा यांच्या अटकेला मुंबई सत्र न्यायालयाची तात्पुरती स्थगिती !

खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जातपडताळणी प्रमाणपत्राच्या प्रकरणातील सुनावणी सर्वाेच्च न्यायालयात चालू असल्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांना १९ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत.

नाशिक येथे ५ वर्षांत तब्बल १० सहस्र घटस्फोट !

पती-पत्नीने धर्माचरण केल्यासच कुटुंबव्यवस्था  अबाधित राहील आणि घटस्फोटांचे प्रमाण न्यून होईल !

जैन मुनींकडून ‘हलाल जिहाद’चा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी आशीर्वाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेल्या अडीच वर्षांत या विरोधात कसे प्रयत्न केले ? आणि त्यात मिळालेले यश यांविषयी मुनीराज श्री जयप्रभ विजयजी यांना त्यांनी अवगत केले, तसेच या मोहिमेसाठी आशीर्वाद मागितले.

ठाणे येथे शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे परस्परांवर आक्रमण !

ठाणे येथील किसननगर भागात शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये १४ नोव्हेंबरला वाद होऊन त्यांनी एकमेकांवर आक्रमण केले. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात अटकपूर्व जामीन संमत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात ठाणे न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाणे येथे आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद केला होता.

‘युटीएस् ॲप’द्वारे आता ५ किलोमीटर अंतरापर्यंतचे तिकीट घेण्याची सुविधा !

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ‘यूटीएस् मोबाईल ॲप’द्वारे तिकीट आरक्षित करण्यासाठीच्या अंतराच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणून उपनगरीय तिकिटांसाठी अंतराची मर्यादा २ किलोमीटरवरून ५ किलोमीटर करण्यात आली आहे