वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास यांचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !

हिंदूंच्या संघटित लढ्याचा परिणाम !

अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त !  

हिंदुत्वनिष्ठांच्या २० वर्षांच्या लढ्याला यश !
पोलिसांचा चोख बंदोबस्त : परिसरात जमावबंदी लागू !

रेल्वे प्रवासात आता मिळणार सात्त्विक शाकाहारी जेवण !

रेल्वेने प्रवास करणार्‍या यात्रेकरूंना प्रवासाच्या कालावधीत आता सात्त्विक शाकाहारी जेवण मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेचे आस्थापन ‘आय.आर्.सी.टी.सी.’ आणि ‘इस्कॉन’ ही आध्यात्मिक संस्था यांच्यामध्ये करार झाला आहे.

ईशान्य भारताला जाणवले भूकंपाचे धक्के !

ईशान्य भारतात १० नोव्हेंबर या दिवशी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील पश्‍चिम सियांग येथे होता.

‘ब्रिटन गुलामांच्या रक्तावर उभा आहे’, असे म्हणत तरुणाने ब्रिटनचे राजे चार्ल्स (तृतीय) यांच्यावर अंडी फेकली !

ब्रिटनच्या यॉर्कशायरमध्ये राजा चार्ल्स (तृतीय) यांच्यावर येथे आंदोलन करणार्‍या २३ वर्षीय तरुणाने अंडी फेकल्याने त्याला अटक करण्यात आली. ही ही अंडी चार्ल्स यांना लागली नाहीत.

केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत ! – उद्धव ठाकरे

संजय राऊत यांच्या जामिनाच्या वेळी न्यायालयाने अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत, हे जगजाहीर झाले आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

धर्मांतरित ख्रिस्ती आणि मुसलमान यांना आरक्षणासारखे लाभ देता येत नाहीत !  

केंद्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन
केंद्र सरकारचे अभिनंदनीय धोरण !

पंजाबमध्ये श्री गुरु ग्रंथसाहिबचा अपमान केल्याच्या प्रकरणी डेरा सच्चा सौदा संप्रदायाच्या भक्ताची गोळ्या झाडून हत्या

पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळती स्थिती पहाता आताच त्यावर कठोर निर्णय घेत राष्ट्रपती शासन लाग करणे आवश्यक आहे !

मनोरंजन वाहिन्यांना प्रतिदिन देशहिताच्या कार्यक्रमासाठी ३० मिनिटे द्यावे लागणार !

केंद्रशासनाचेे मनोरंजन वाहिन्यांसाठी नवीन नियम

पंतप्रधान नरेेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार ! –  खासदार संजय राऊत, शिवसेना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार चालत आहे. कारागृहातील समस्यांविषयी मी त्यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन माझ्यासमवेत काय झाले, हे त्यांना सांगीन, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.