नाशिक येथे ५ वर्षांत तब्बल १० सहस्र घटस्फोट !

  • भ्रमणभाषसंच हेच घटस्फोटाचे मुख्य कारण !

  • सामाजिक माध्यमे आणि व्हॉट्सॲप यांमुळे पती-पत्नींतील वाद वाढले !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – नाशिक येथे गेल्या ५ वर्षांत १० सहस्र १४ घटस्फोट झाले आहेत. घटस्फोटासाठी प्रतिदिन कौटुंबिक न्यायालयात १० अर्ज येत आहेत. घटस्फोटांचे प्रमाण तरुणाईसाठीच नाही, तर अनेक कुटुंबांसाठी चिंतेची गोष्ट ठरत आहे. घटस्फोटामागे मुख्य कारण भ्रमणभाष (मोबाईल) हेच आहे. ‘व्हॉट्सॲप’सह इतर सामाजिक माध्यमांमुळे पत्नी-पत्नी यांच्यातील वाढत जाणारी भांडणे, आर्थिक आणि कौटुंबिक वाद, नोकरी जाणे आणि वेतन अल्प असणे आदी गोष्टीही घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत आहेत.

नाशिक शहरात वर्ष २०१८ ते ऑक्टोबर २०२२ या ५ वर्षांच्या काळात ६ सहस्र ६३८ एवढे घटस्फोटांचे दावे कौटुंबिक न्यायालयात प्रविष्ट झाले आहेत. त्यापैकी ५ सहस्र ४६० दावे निकाली निघाले आहेत. निकाली निघालेल्या दाव्यातील तब्बल १० सहस्र १४ जोडप्यांचे घटस्फोट झाले आहेत, तर फक्त १ सहस्र ९७४ जोडप्यांची मने जुळली असून घटस्फोटांच्या तुलनेत हे प्रमाण पुष्कळ अल्प आहे.

संपादकीय भूमिका

पती-पत्नीने धर्माचरण केल्यासच कुटुंबव्यवस्था  अबाधित राहील आणि घटस्फोटांचे प्रमाण न्यून होईल !