‘२६/११’च्या आक्रमणात वीरमरण आलेले सैनिक आणि पोलीस यांना राज्यपाल, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली

या आक्रमणात १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ३४ विदेशी नागरिकांचाही समावेश होता. ७०० हून अधिक जण घायाळ झाले होते. आतंकवाद्यांच्या या आक्रमणात १८ पोलिसांना वीरमरण आले.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन

ज्या योद्धयांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न मोठ्या नेत्यांनी केला नाही. आपले लोक ब्रिटिशांविरुद्ध लढत आहेत, हे पाहूनही त्यांनी वाचवले नाही- विक्रम गोखले

(म्हणे) ‘अंकाद्वारे भविष्य पहाणे, हे शास्त्र असल्याचे सिद्ध करा आणि २१ लाख रुपये मिळवा !’

अंनिसने प्रथम स्वतःच्या संघटनेतील भ्रष्टाचार, अंतर्गत कलह आणि मनमानी कारभार थांबवण्याकडे लक्ष द्यावे !

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गामध्ये तुर्कीयेला सहभागी होण्यासाठी पाकचे आमंत्रण

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग योजनेमध्ये तुर्कीये देशालाही सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि राहुल गांधी यांचा दिसून येणारा फोलपणा !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड केला. त्या पत्रकार परिषदेतील काही निवडक भाग येथे प्रसिद्ध करत आहोत.

देशी मिठाई आणि नमकीन यांच्या पॅकबंद पदार्थांवर आरोग्याला हानीकारक असल्याचे लेबल लागणार !

साखर आणि मीठ यांची मात्रा अधिक असल्यास अशा खाद्यपदार्थांना आरोग्यासाठी हानीकारक ठरवले जाणार आहे. पॅकबंद खाद्यपदार्थांच्या डब्यावर अशा प्रकारचे लेबल लावण्यात येणार आहे.

आज डोंबिवली येथे ‘आपले संविधान’ या ग्रंथाचे प्रकाशन

डोंबिवली ग्रंथालय आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अन विवेक प्रकाशाच्या वतीने संविधान दिनानिमित्त हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश पतंगे लिखित ‘आपले संविधान’ तत्वविचार-मूल्य संकल्पना-ध्येयवाद या ग्रंथाचे प्रकाशन अधिवक्ता प्रकाश साळशिंगीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मुसलमानाच्या हत्येमुळे संतापलेल्या कुटुबियांची रुग्णालयात तोडफोड

प्रत्येक घटनेत मुसलमान थेट कायदा हातात घेतात; पण तरीही पुरो(अधो)गामी  वैध मार्गांनी आंदोलन करणार्‍या हिंदूंनाच हिंसक ठरवतात !

अफझलपूर (कर्नाटक) येथील सरकारी शाळेमध्ये आणून ठेवलेले थडगे प्रशासनाने हटवले !

‘एका सरकारी शाळेत अशा प्रकारे थडगे आणण्याचे धाडस भाजप सरकारच्या काळात कसे काय केले जाते आणि शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक काहीच कसे बोलत नाहीत ?’, असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतात !

इस्रोने अवकाशात पाठवले ९ उपग्रह !

‘पी.एस्.एल्.व्ही. (पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल)-सी ५४’ या योजनेच्या अंतर्गत ९ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. यामध्ये ‘ओशनसॅट-३’ या उपग्रहाचा समावेश आहे.