संभाजीनगर येथील भुयारी मार्गासाठी मनसेच्या वतीने आंदोलन !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ९ नोव्हेंबर या दिवशी येथील शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी आंदोलन करण्यात आले. सरकारने त्वरित पूर्ण निधी संमत करून भुयारी मार्ग सिद्ध करून द्यावा; अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी मनसेच्या वतीने या वेळी देण्यात आली.