स्वातंत्र्यसैनिकांना दरमास २० सहस्र रुपये निवृत्तीवेतन देण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि गोवा मुक्तीसंग्राम या लढ्यात सहभागी सैनिकांना दरमहा २० सहस्र रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

यावल (जळगाव) येथील महाविद्यालयात अचानक गणवेश पालटण्याचा निर्णय !

यावल येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गणवेश अचानक पालटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्षाचा अर्धा कालावधी उलटला असतांना नवीन ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने…

शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन संमत !

शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबर या दिवशी जामीन संमत केला. एप्रिल २०२० पासून ते अटकेत होते.

दौंड (पुणे) येथे नितेश राणे यांच्या नेतृत्वात हिंदु जनआक्रोश आंदोलन !

येथील कुंभार गल्ली परिसरात २० ऑक्टोबर या दिवशी जिहादी मानसिकता असणार्‍या रशीद शेख आणि इलियास शेख यांनी हिंदु मुलीची भर रस्त्यात छेड काढली अन् मुलीचा भाऊ याविषयी जाब विचारण्यासाठी गेला असता, याचा राग मनात धरून ५० ते ६० च्या समुहाने त्या हिंदु कुटुंबाच्या घरात घुसून प्राणघातक आक्रमण केले.

ठाणे येथे राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव कांदळी (पुणे) येथे भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा महानिर्वाण उत्सव कार्तिक कृष्ण पक्ष नवमी, म्हणजेच १८ नोव्हेंबर या दिवशी कांदळी, ता. जुन्नर, जिल्हा पुणे येथील त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

पू. अश्विनीताई, परात्पर गुरु डॉक्टरांनी तुझ्या रूपाने सदैव मला सांभाळले ।

बालवयात तुझे साधकत्व अनुभवले । तरुणपणी तुझे समष्टी गुण अनुभवले । ‘संत’ म्हणून तुझे चैतन्यही अनुभवले । परम पूज्यांनी (टीप १) तुझ्या रूपाने सदैव मला सांभाळले ।। १ ।। भाव तुझ्या डोळ्यांत नेहमीच दिसायचा । तुझ्यासारखे बनायचा ध्यास मला लागायचा । तुझा आदर्श परम पूज्यांनी दिला सर्वांना । गाठलेस तू संतपद आणि आनंद झाला सर्वांना … Read more

 सत्र न्यायालयाचा पोलीस यंत्रणेवर संताप व्यक्त !

अन्वेषण यंत्रणांच्या दायित्वशून्यतेमुळे ज्या निरपराध्यांना याचा त्रास भोगावा लागतो, त्यांना या यंत्रणेच्या अधिकार्‍यांकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे.

स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, तर जवाहरलाल नेहरू खरे ‘माफीवीर’ ! – भाजप

५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा आनंदाने स्वीकारून ती १५ वर्षे अतोनात यातना सहन करून भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही.

देवद, पनवेल येथील आश्रमात पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा लाभलेला सत्संग आणि त्यांचे चैतन्यमय अन् ममतामयी बोलणे ऐकून साधकाने अनुभवलेली भावावस्था !

‘त्यांच्या बोलण्यातून प्रीती ओसंडून वहात आहे’, असे मला वाटत होते. त्यांचे बोलणे ऐकतांना मला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईच बोलत आहेत’, असे जाणवत होते.