जैन मुनींकडून ‘हलाल जिहाद’चा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी आशीर्वाद !

मुनीराज जयप्रभ विजयजी यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट देतांना डावीकडून श्री. पराग गोखले आणि श्री. कृष्णाजी पाटील

पुणे, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – जैन समाजाचे क्रांतीकारी प्रवचनकार मुनीराज श्री जयप्रभ विजयजी म.सा.(जे.पी. गुरुदेव) यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच भेट घेण्यात आली. या वेळी ‘हलाल : एक आर्थिक जिहाद’ या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सविस्तर माहिती दिली. समितीच्या वतीने गेल्या अडीच वर्षांत या विरोधात कसे प्रयत्न केले ? आणि त्यात मिळालेले यश यांविषयी मुनीराज श्री जयप्रभ विजयजी यांना त्यांनी अवगत केले, तसेच या मोहिमेसाठी आशीर्वाद मागितले. समितीच्या मोहिमेच्या संदर्भात सविस्तर जाणून घेऊन ‘यासाठी माझे आशीर्वाद नक्कीच आहेत, असतील आणि यापुढे जाऊन आपण मोठ्या कृतीसाठी प्रयत्न करूया’, असे आशीर्वाद गुरुदेवांनी दिले. ‘हा विषय अधिकाधिक लोकापर्यंत कसा जाईल ? यासाठीही प्रयत्न करूया’, असे मुनीराज म्हणाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचा हिंदी भाषेतील ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ त्यांना भेट देण्यात आला. या वेळी समितीचे श्री. कृष्णाजी पाटील हेही उपस्थित होते.