ठाणे येथे शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे परस्परांवर आक्रमण !

दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद

ठाणे, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – ठाणे येथील किसननगर भागात शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये १४ नोव्हेंबरला वाद होऊन त्यांनी एकमेकांवर आक्रमण केले. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद केले आहेत. शिंदे गटाचे माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्यासह १० ते १५ कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले असून ठाकरे गटाचे दीपक साळवी यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.