पंतप्रधान मोदी यांची मोरबी (गुजरात) येथे अपघातग्रस्त भागाला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. यासह त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन घायाळ झालेल्या लोकांची विचारपूस केली.

शैक्षणिक तणावावर तोडगा म्हणून ‘आयआयटी’ची पदविका योजना

काही विद्यार्थी शैक्षणिक तणावाला तोंड देऊ शकत नसल्याने ‘आयआयटी’ शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

इटलीतील नवे सरकार ‘रेव्ह पार्ट्यां’च्या आयोजकांवर कठोर कारवाई करणार

ज्योर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील कट्टर राष्ट्रवादी विचारसरणी असलेल्या इटली सरकारने रेव्ह पार्ट्या आयोजित करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे नैराश्यात वाढ होते ! – अमेरिकेतील सर्वेक्षण

जे विद्यार्थी दिवसातील अधिकाधिक वेळ भ्रमणभाषच्या सहवासात असतात, त्यांना नैराश्य आणि एकाकीपणा यांची सवय लागते. भ्रमणभाषवर संदेश आला नसेल किंवा सूचना (नोटिफिकेशन्स) आली नसेल, तरीही भ्रमणभाष पाहिला जातो.’

‘व्हिडिओ गेम’चे दुष्परिणाम जाणा !

विध्वंसक खेळ खेळणारी मुले खेळ खेळून झाल्यावर पुढच्या २४ घंट्यांतही (तासांतही) विध्वंसक वागतात. विध्वंसक खेळ खेळणार्‍या मुलांमध्ये वाईट स्वप्ने पडून भीतीने थरथरत उठण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक असते.’

‘रामायण’ या मालिकेत रावणाची, म्हणजे खलनायकाची भूमिका साकारूनही हृदयमंदिरातील श्रीरामभक्तीमुळे खर्‍या जीवनात ‘महानायक’ ठरलेले (कै.) अरविंद त्रिवेदी !

कै. रामानंद सागरनिर्मित ‘रामायण’ या मालिकेतील रावणाची भूमिका साकारणारे कै. अरविंद त्रिवेदी ! ‘पहाडी आवाज, बलशाली शरीरयष्टी आणि दमदार संवाद’, यांमुळे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

१३ व्या वर्षी प्रेमात अन् १५ व्या वर्षी नात्यात…कोवळ्या वयात मन भलतेच गुंते !

पालक करत असलेली सर्वांत मोठी चूक, म्हणजे मुलांच्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यावर बंदी आणणे. तरुण उसळते रक्त तुम्ही अधिक काळ थोपवून धरू शकत नाही, ते अजूनच उसळते. त्याला योग्य प्रवाहाची दिशा दिली, तरच ते आटोक्यात रहाते.

कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणार्‍या दिंडीमध्ये चारचाकी वाहन घुसून ७ भाविकांना चिरडले !

मृत वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावाचे रहिवासी आहेत. ही दिंडी कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पायी पंढरपूरकडे निघाली होती. घायाळ झालेल्या वारकर्‍यांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी; मात्र नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीच्या नावाखाली उघडपणे चालणार्‍या अश्‍लील नृत्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

अश्‍लीलता पसरवणार्‍यांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ?

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदु आणि मुसलमान तृतीयपंथी यांच्यात वाद

मुसलमान तृतीय पंथियांकडून हिंदु तृतीय पंथियांंवर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव !