नागपूर येथे पोलिसांनी ट्रकमधून १ कोटी ५ लाखांचा गांजा पकडला !

पोलिसांनी धाड टाकून ओडिशा राज्याच्या ट्रकमधून १ सहस्र ५०० किलोचा साधारण १ कोटी ५ लाख रुपयांचा गांजा पकडला आहे. मादक पदार्थ विरोधी पथकाची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई मानली जाते.

ब्रिटनने जगातील धोकादायक देशांच्या सूचीतून पाकचे नाव हटवले !

ब्रिटन सरकारने पाकिस्तानला जगातील धोकादायक देशांच्या सूचीतून काढले आहे. नुकतेच ‘फायनेंशियल ॲक्शन टास्क फोर्स (एफ्.ए.टी.एफ्.)’ या संस्थेने पाकला करड्या सूचीतून बाहेर काढल्यामुळे ब्रिटनने हा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील पाणीपुरवठा विस्कळीत !

गेल्या ४ दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची असुविधा झाली आहे. काही दिवसांपासून शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत आहे.

दुर्ग (छत्तीसगड) येथील तहसील कार्यालयासह शेकडो एकर भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाचा ‘लँड जिहाद’ !

काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात भाजपची निदर्शने !

हिंदू संघटित नसल्यामुळेच कुणीही उठतो आणि हिंदु धर्म अन् राष्ट्रपुरुष यांवर टीका करतो. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन स्वत:ची शक्ती दाखवल्यास हिंदु धर्म आणि राष्ट्रपुरुष यांवर टीका करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही !

हुब्बळ्ळी येथे बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

कर्नाटक पोलिसांनी शहरात बलपूर्वक धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ख्रिस्ती धर्मप्रचारक हिंदु धर्मातील शिक्कलगार समुदायाला लक्ष्य करून संपूर्ण समाजाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हजारीबाग (झारखंड) येथे धर्मांधांनी हिंदु मुलीचे अपहरण

पीडित मुलगी बेंगळुरू येथे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘बलपूर्वक धर्मांतर करून विवाह करण्याच्या उद्देशाने माझ्या मुलीचे अपहरण केले’, असा आरोप मुलीच्या आईने केला आहे.

नगर येथील ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ नाटकावर आक्षेप घेत सावरकरप्रेमी आक्रमक !

या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप सावरकरप्रेमींनी केला आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटात ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटनांचा समावेश ! – अमर देशपांडे आणि किरण देशपांडे, बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज

दुर्दैवाने ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या संदर्भात अशा अनेक ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटना दाखवण्यात आल्या आहेत, असे मत बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज अमर देशपांडे आणि किरण देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आरोपीच्या बोलण्यावर विश्‍वास न ठेवता पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करावेत ! – मीरा बोरवणकर, माजी आय.पी.एस्. अधिकारी

आरोपीने दिलेल्या माहितीला पोलिसांनी शून्य मूल्य देऊन परिस्थितीजन्य पुरावे शोधले पाहिजेत, असा सल्ला माजी आय.पी.एस्. अधिकारी मीरा बोरवणकर यांनी श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात पोलिसांना दिला आहे.