असंरक्षित गड-दुर्गांची जिल्हानिहाय माहिती गोळा करण्यात येणार !
गड-दुर्गांची माहिती देण्यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण देणार !
गड-दुर्गांची माहिती देण्यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण देणार !
जिल्ह्यातील सवालाख शेतकर्यांना पीक विमा आस्थापनांनी लुटले, तसेच मोठा घोळ केला, असा दावा केला जात आहे. भरलेला आणि मिळालेला पीक विमा यांत प्रचंड तफावत आहे. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला..
वरिष्ठ दलित नेत्यांच्या विरोधात सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह आणि अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी पनवेल येथील जगदीश गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली होती. जामीन मिळून परत जातांना अन्य एका प्रकरणी कर्जत पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले होते.
ते म्हणाले की, विकास आराखड्यामध्ये बाधित होणारे स्थानिक व्यापारी आणि रहिवासी यांना राज्य सरकारने भरीव आर्थिक साहाय्य देऊन त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे; परंतु विकासकामाला व्यापार्यांनी विरोध करू नये.
एवढ्या प्रचंड प्रमाणात अतिक्रमण वाढेपर्यंत प्रशासन डोळे मिटून का रहाते ? ही अतिक्रमणे नियमित करून सरकार गायरान भूमीसाठी वेगळी जागा देणार का ?
शासनाच्या विविध १४ विभागांतील रिक्त पदांची माहिती १५ डिसेंबरपर्यंत शासनाकडे सादर केलीच पाहिजे, अशी सक्त ताकीद सरकारकडून देण्यात आली आहे. याचा अभ्यास करून जानेवारी २०२३ मध्ये राज्यातील ७५ सहस्र शासकीय पदांच्या भरतीची विज्ञापने प्रसारित करण्यात येणार आहेत.
धरणगाव येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.
मागील अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले उद्योग कोणत्या कारणांमुळे गेले याचे अन्वेषण करण्यात येणार आहे. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करून येत्या ३ मासांत याविषयीचा अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
देहलीतील आम आदमी पक्षाचे सरकार हिंदूंशी भेदभाव करते. मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वारांच्या ग्रंथी यांनाही इमाम आणि मुएझिन यांच्याप्रमाणे पगार मिळायला हवा.
अक्कलकोट तालुक्यातील २८ गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूल सुविधा मिळत नाही. यामुळे संतप्त झालेल्या या गावांमधील ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्यास इच्छुक असल्याचे सांगितले