राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात अटकपूर्व जामीन संमत

जितेंद्र आव्हाड

ठाणे, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात ठाणे न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाणे येथे आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद केला होता. यानंतर आव्हाड यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.