कैलास स्मशानभूमीत लवकरच वायू (गॅस) दाहिनी ! – राजेंद्र चोरगे

‘श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून आणि लोकसहभागातून संगम माहुली येथे कैलास स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. आता या स्मशानभूतीत लवकरच वायू (गॅस) दाहिनी बसवण्यात येणार आहे, अशी माहिती ‘श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

१५ वर्षांनंतर प्रथमच चिकन आणि मासे यांच्या नमुन्यांची पडताळणी करणार !

अन्न आणि औषध प्रशासनाकडून १५ वर्षांनंतर प्रथमच राज्यातील विक्रेत्यांकडील चिकन अन् मासे यांची पडताळणी करण्यात येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याविषयी आदेश काढले.

ब्रिटिशांनी आपली समृद्ध शैक्षणिक परंपरा नष्ट करून आपल्यात न्यूनगंड निर्माण केला ! – डॉ. प्रभाकर मांडे, ज्येष्ठ लोकसाहित्यकार

भारताला समृद्ध अशी शैक्षणिक परंपरा होती; परंतु ब्रिटिशांनी ही परंपरा नष्ट केली आणि आपल्यात न्यूनगंड निर्माण केला. हा सगळा इतिहास वाचण्याची आवश्यकता आहे. नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला विद्येच्या परंपरेला जागे करण्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे.

स्त्रियांमध्ये असलेली राष्ट्रशक्ती त्यांनी जागृत केली पाहिजे ! – सौ. कल्याणी गाडगीळ

पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या संदर्भात जागृत राहून शाळा-महाविद्यालयात जाणार्‍या मुलींविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. समाजात वावरतांना महिलांनी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या ग्रंथालयास वर्ष १७८६ मधील दुर्मिळ हस्तलिखित ‘गुरुचरित्र’ प्राप्त !

ज्या भाविकांकडे असे दुर्मिळ ग्रंथ असतील, त्यांनी ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला द्यावेत, असे आवाहन सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांनी केले आहे.

पंढरपूर येथे एकादशीनिमित्त सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केला ‘निर्धार फाऊंडेशन’चा सन्मान !

कार्तिकी वारीच्या निमित्ताने निर्धार फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘सांगलीची स्वच्छतावारी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारी’ ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती.

राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवण्यात यावे ! – उदयनराजे भोसले

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांविषयी केलेले वक्तव्य अयोग्य असून त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

पुणे येथील नवले पुलावरील अपघातात टँकरचे ब्रेक निकामी झाले नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे स्पष्टीकरण

येथील पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज-आंबेगावजवळील नवले पुलावर २० नोव्हेंबरला रात्री साडेनऊ वाजता मुंबईच्या दिशेने जात असलेल्या टँकरचा भीषण अपघात झाला होता. हा टँकर सातार्‍याहून मुंबईच्या दिशेने येत होता.