साधकजिवांना भक्तीरसात डुंबवणारा श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दिव्य आनंददायी ‘रथोत्सव’ सोहळा !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त दिव्य आनंददायी ‘रथोत्सव’ २२ मे २०२२ या दिवशी साजरा करण्यात आला. २२ मेच्या आधी २ दिवस मुसळधार पाऊस पडत होता. रथोत्सवाच्या दिवशी पावसाने विश्रांती घेऊन साधकांचे भिजण्यापासून रक्षण केले खरे; परंतु गुरुदेवांच्या केवळ दर्शनाने जागृत झालेल्या भावाश्रूंत साधक न्हाऊन निघाले.