खटाव तालुक्यावर शोककळा

सातारा, २८ मे (वार्ता.) – लडाख येथे सैनिकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये खटाव तालुक्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना वीरमरण प्राप्त झाले. यामुळे शिंदे कुटुंबियांसह संपूर्ण खटाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
विजय शिंदे हे वर्ष १९९८ मध्ये २२ मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले. २४ वर्षांच्या काळात त्यांनी विविध ठिकाणी काम करून देशाचे रक्षण केले. विजय यांचे वडील सर्जेराव शिंदे हेही लष्करामध्ये होते, तसेच विजय यांचे मोठे बंधू प्रमोद शिंदे हे लष्करात पॅरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत. विजय शिंदे यांचे पार्थिव २९ मे या दिवशी विसापूर येथे आणले जाणार आहे. तिथेच शासकीय पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी