भृगु महर्षींच्या आज्ञेने विजयादशमी म्हणजेच दसर्‍याच्या शुभदिनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर अभिमंत्रित सुवर्णाभिषेक !

सनातनच्या इतिहासातील सुवर्णक्षण !
‘उत्पत्ती लय लेश ना ज्याला । आदी अंताचा माप न ज्याला ॥
तृप्ती रूप देखता । वंदूया निखिल ब्रह्म अवधूता ॥’

भृगु महर्षींच्या आज्ञेने भावपूर्ण वातावरणात पार पडलेला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील अभिमंत्रित सुवर्णाभिषेक सोहळा !

साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या या सुवर्णदिनी महर्षि भृगु यांनी साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांवर अभिमंत्रित सुवर्णाभिषेक करण्याचे भाग्य प्रदान केले आणि साधकांच्या मनातील ही इच्छाही पूर्ण केली.

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री काळभैरवपूजन, महाचंडी याग आणि श्री बगलामुखी याग !

नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या या कार्यरत शक्तीद्वारे हिंदु राष्ट्र-स्थापनेतील विविध अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि साधकांना विविध कारणांमुळे होणारे शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’, यांसाठी श्री काळभैरवपूजन, ‘महाचंडीयाग’, श्री बगलामुखी याग करण्यात आला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सुवर्णाभिषेक सोहळ्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘गुरूंना सुवर्णाभिषेकाच्या वेळी कलशातील पाण्याने प्रोक्षण करतांना जसजसे त्यांच्या अंगावरून पाणी खाली पडत जाईल, तसतसे हिंदु राष्ट्र-स्थापनेतील अडथळे आपोआप दूर होतील’, असे महर्षींनी सांगितले होते.

कुंकूम मळवट भरल्या सद्गुरुद्वयी । चंडीयागाच्या दिनी जणू प्रकटली भवानी ।

६ ऑक्टोबर या दिवशी तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरातील मुख्य पुजारी यांना श्री भवानीदेवीने दृष्टांत देऊन सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींनाही देवीच्या कपाळावर असतात, तसे मळवट लावण्यास सांगितले.

भृगु महर्षींच्या आज्ञेने विजयादशमीच्या शुभदिनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर अभिमंत्रित सुवर्णाभिषेक !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ८ ऑक्टोबर या दसर्‍याच्या शुभदिनी भृगु महर्षींच्या आज्ञेने हा सोहळा पार पडला अन् सनातनच्या इतिहासात हा दिन खर्‍या अर्थाने सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.

भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात झाले पितृपक्षातील तिसरे श्री महाविष्णु पूजन आणि ऋषि पितृपूजन

१४ आणि २१ सप्टेंबर या दिवशी हे पूजन करण्यात आल्यानंतर याच श्रृंखलेतील तिसरे आणि शेवटचे पूजन सर्वपित्री अमावास्या, म्हणजे २८ सप्टेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF