सनातनची ग्रंथमालिका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरित्र, कार्य आणि विचार

‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक, सर्वांगस्पर्शी विपुल ग्रंथसंपदा लिहिणारे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे, सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधक, मोक्षगुरु इत्यादी वैशिष्ट्यांनी विभूषित असलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक जीवनगाथेचा परिचय करून घ्या !

त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी ।

ज्यांचे पंचमहाभूतांवर नियंत्रण आहे, ज्यांची प्रभा दिव्य आणि तेजस्वी आहे, ज्यांचे दैवी हास्य मनाचा ठाव घेते, ज्यांचा वात्सल्यमय कृपाकटाक्ष साधकांना आश्वस्त करतो, ज्यांच्या केवळ दर्शनानेही अनेक संकटांचे हरण होते, ते श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव साधकांचा प्राणच आहेत ! अशा श्रीविष्णुरूपातील गुरूंच्या तेजस्वी मुद्रांचे मनोहारी दर्शन डोळे भरून घेऊया !

प्रत्येक हिंदू अखंड हिंदु राष्ट्राचा संकल्प करत आहे, याचे संपूर्ण श्रेय प.पू. गुरुजींना ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

प.पू. आठवले गुरुजी (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले) यांच्या चरणी प्रणाम करतो. त्यांच्या ८० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊ इच्छितो.

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’त ७० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

या अभियानात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, विभिन्न धर्मसंप्रदाय एकत्र येऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदूसंघटनाच्या विचाराला बळकट बनवले.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त संतांकडून शुभेच्छा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्म विद्येला पुन्हा उजळवण्याचे कार्य महनीय ! – प.पू. गोविंददेवगिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या रथोत्सवाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महर्षींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा रथोत्सव साजरा करण्यात आला. देवाच्या कृपेने या रथोत्सवाचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीविष्णूच्या रूपातील झालेला दिव्य रथोत्सव म्हणजे ईश्वराची अनुभवलेली अद्भुत लीला !

सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव साजरा होण्यापूर्वी ईश्वराने रथोत्सवाच्या संदर्भात कशी लीला घडवली, याविषयी या लेखातून जाणून घेऊया. श्रीकाकुलम्आणि श्री जगन्नाथ पुरी येथील रथोत्सवाचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिव्य रथोत्सवाशी संबंध असणे, हे ईश्वरी नियोजन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या केलेल्या रथोत्सवाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

हा रथोत्सव सप्तर्षी अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असा व्हावा आणि या रथोत्सवाचे सप्तर्षींना अपेक्षित असे कार्य पूर्ण फलदायी व्हावे, यांसाठी मला नामजपादी उपाय करायचे दायित्व दिले होते. या संदर्भात गुरुदेवांनी माझ्याकडून पुढील सेवा करवून घेतल्या.

दिंड्या, पताका वैष्णव नाचती । श्रीमन्नारायणाचा महिमा वर्णावा किती ।।

श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचा ‘न भूतो, न भविष्यती’ असा दिव्य रथोत्सव !

साधकजिवांना भक्तीरसात डुंबवणारा श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दिव्य आनंददायी ‘रथोत्सव’ सोहळा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त दिव्य आनंददायी ‘रथोत्सव’ २२ मे २०२२ या दिवशी साजरा करण्यात आला. २२ मेच्या आधी २ दिवस मुसळधार पाऊस पडत होता. रथोत्सवाच्या दिवशी पावसाने विश्रांती घेऊन साधकांचे भिजण्यापासून रक्षण केले खरे; परंतु गुरुदेवांच्या केवळ दर्शनाने जागृत झालेल्या भावाश्रूंत साधक न्हाऊन निघाले.