नाशिक येथे काम करतांना मी घेतलेल्या एकाही निर्णयाचा पश्चात्ताप नाही ! – दीपक पांडे, पोलीस आयुक्त

मी कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले आहेत. एकाही निर्णयाचा मला पश्चात्ताप नाही, अशी प्रतिक्रिया येथील पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी २१ एप्रिल या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली आहे.

अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना २५ एप्रिलपर्यंत कोल्हापूर येथे पोलीस कोठडी !

मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या प्रकरणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी अधिवक्ता सदावर्ते यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

सोलापूर येथील ‘हिंदु एकता दिंडी’ला मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त येथे १५ मे या दिवशी सनातन संस्था आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची तुकडे तुकडे टोळी शरद पवार यांनी आवरावी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदु धर्म आणि पुरोहित यांची टिंगल केल्याने असंतोष निर्माण झाला आहे. समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत.

अनधिकृतांचे पाठीराखे !

अनधिकृत बांधकामे ! अशा ठिकाणांहून देशविरोधी कारवाया चालत असल्याचे आतापर्यंत अनेकदा उघड झाले आहे. जहांगीरपुरीतील दंगल हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे ही समस्या केवळ अनधिकृत बांधकामाच्या दृष्टीने न हाताळता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने हाताळणे, ही काळाची आवश्यकता आहे !

नगर येथे पोलिसांच्या मारहाणीत युवक गंभीर घायाळ !

येथील मिरवणुकीत भगवा झेंडा फडकवला आणि भ्रमणभाषवर छायाचित्र ठेवले, तसेच सामाजिक माध्यमांवर झालेल्या संभाषणावरून सोनई पोलिसांनी राजेंद्र मोहिते या तरुणाला कोणत्याही गुन्ह्यात अटक न करता अमानुष मारहाण केली.

पाचवीचा वर्गच नसलेल्या शाळेत मुश्रीफ यांचे नाव कसे ? – समरजितसिंह घाटगे, भाजप

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शाळेच्या दाखल्यामध्ये जन्मदिनांकाच्या नोंदीमध्ये फरक असून ‘पॅनकार्ड’ आणि शाळेचा दाखला यांच्यामध्ये जन्मदिनांक वेगवेगळा आहे. आता खोटे आणि बनावट दाखलेही शोधावे लागतील…

केवळ हिंदूंनीच नियमांचे पालन करायचे का ?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून ठेवण्याच्या केलेल्या आवाहनावर हा निर्णय घेण्यात आला.

संमेलन कि मनोरंजन ?

९४ वे मराठी साहित्य संमेलनासंदर्भात ‘पंचतारांकित संमेलनाच्या नादात महामंडळाचा हेतू आणि धोरणे यांचा बळी दिला गेला’, अशी टीका केली गेली होती. ‘देश आर्थिक संकटात असतांना लोकवर्गणीतून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी आणि असा भपकेबाजपणा उद्गीर येथील संमेलनात होणे अपेक्षित नाही.’