मिरवणुकीत भगवा झेंडा फडकावला आणि भ्रमणभाषवर भगव्याचे छायाचित्र ठेवले म्हणून पोलिसांनी केली अमानुष मारहाण !

सोनई (नगर) – येथील मिरवणुकीत भगवा झेंडा फडकवला आणि भ्रमणभाषवर छायाचित्र ठेवले, तसेच सामाजिक माध्यमांवर झालेल्या संभाषणावरून सोनई पोलिसांनी राजेंद्र मोहिते या तरुणाला कोणत्याही गुन्ह्यात अटक न करता अमानुष मारहाण केली. त्यामुळे या युवकावर लोणी प्रवरानगर येथे अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत. या प्रकरणी राजेंद्र मोहिते यांच्या कुटुंबियांनी राज्याचे गृहमंत्री आणि नगरचे पोलीस अधीक्षक यांना याविषयी निवेदन दिले आहे.
या प्रकरणी राजेंद्र मोहिते यांचे भाऊ अजय मोहिते यांनी सांगितले की, समज देण्याच्या नावाखाली अपरात्री सोनई पोलिसांनी घरी येऊन राजेंद्र मोहिते यांच्या परिवारास धमकावले, तसेच राजेंद्र मोहिते यास पोलीस ठाण्यात नेऊन अमानुषपणे मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर आम्ही उपोषण करणार, तसेच कुणी या प्रकाराची नोंद घेतली नाही, तर उच्च न्यायालयात याचिका मांडून न्याय मिळावा यासाठी लढत राहू.
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात