अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विधीमंडळात संघर्ष करू ! – देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारी पक्षाकडून आयोजित करण्यात येणार्‍या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.

काळी जादू उतरवण्याच्या कारणाने २ धर्मांधांकडून महिलेवर बलात्कार !

नालासोपारा येथे २६ फेब्रुवारी या दिवशी काळी जादू उतरवण्याच्या कारणाने २ धर्मांधांनी एका महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी मौलाना रजब शेख आणि शहाबुद्दीन शेख यांना अटक केली आहे.

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांची सुटका नाहीच !

अंमलबजावणी संचालनालयाने दाऊद इब्राहिम याच्या आर्थिक गैरव्यवहाराची पडताळणी चालू केली आहे. या प्रकरणी  पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) कायद्याच्या अंतर्गत मलिक यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

डॉ. पोखरणा यांना अटक आणि सुटका !

६ नोव्हेंबर २०२१ या दिवशी जिल्हा रुग्णालयातील कोविड अतीदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीमध्ये १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी डॉ. सुनील पोखरणा यांना तोफखाना पोलिसांनी २८ फेब्रुवारी या दिवशी दुपारी अटक केली.

शेवटची १५ मिनिटे !

आयुष्याच्या शेवटच्या १५ मिनिटांची वाट पहाण्यापेक्षा जीवन जगतांनाच प्रतिदिन १५ मिनिटे देऊन आत्मचिंतन करून स्वतःत सुधारणा केली पाहिजे, तर आयुष्यात पश्चात्तापाची वेळ येणार नाही. त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे शेवटचा दिवस खर्‍या अर्थाने गोड होईल !

अनैतिक संबंधाच्या संशयातून वर्षापूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी ६ आरोपींना अटक

तालुक्यातील वसंतनगर येथील विठ्ठल परसराम शास्त्रकार (वय ५१ वर्षे) हे ९ मार्च २०२१ या दिवसापासून गायब होते. पुतणसुनेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून कुटुंबातील व्यक्तीनेच त्यांची हत्या केल्याचे पोलीस पडताळणीतून उघड झाले.

 पुणे येथे समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांवर गुन्हा नोंद !

महाआरती करून दिशाभूल करणारी पत्रके वाटून २ समाजात तेढ, द्वेष निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

ही स्थिती भारत कधी पालटणार ?

डॉक्टर बनू पहाणारे भारतातील विद्यार्थी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील जातीयवाद आणि लाचखोरी यांमुळे युक्रेनकडे जात आहेत, असा आरोप युक्रेन येथे ठार झालेला भारतीय विद्यार्थी नवीन याचे वडील शेखरप्पा ज्ञानगौडा यांनी केला.

तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती शाळेत शिकणार्‍या विद्यार्थिनीची आत्महत्या आणि मद्रास उच्च न्यायालयाचा अन्वेषणाविषयीचा निवाडा !

ही कामे करणे शक्य नसतांनाही छळ आणि बळजोरी यांमुळे ती मला करावी लागत होती. मला धर्मांतर करायचे नव्हते. त्यामुळे मला आत्महत्या करण्याविना पर्याय नव्हता.’’

युक्रेनच्या युद्धात रशियाने वापरलेला धोकादायक ‘व्हॅक्युम बाँब’ !

रशियाने जर युक्रेनमध्ये ‘व्हॅक्युम बाँब’ वापरला असेल, तर ते अतिशय चुकीचे आहे; कारण आंतरराष्ट्रीय कायदा एवढा मोठा विध्वंसक बाँब वापरण्याची अनुमती देत नाही. त्यामुळे रशियाची ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध आहे.