अनैतिकतेचा भस्मासुर नष्ट करण्यासाठी धर्मशिक्षणच आवश्यक ! – संपादक
दिग्रस (यवतमाळ) – तालुक्यातील वसंतनगर येथील विठ्ठल परसराम शास्त्रकार (वय ५१ वर्षे) हे ९ मार्च २०२१ या दिवसापासून गायब होते. पुतणसुनेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून कुटुंबातील व्यक्तीनेच त्यांची हत्या केल्याचे पोलीस पडताळणीतून उघड झाले. मुरलीधर परसराम शास्त्रकार यांनी त्यांच्या मोठ्या भावाचे अपहरण कुटुंबातील व्यक्तीनेच केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली. यात नितीन लक्ष्मण शास्त्रकार याने २ मित्रांसमवेत दगडाने ठेचून हत्या केल्याचे मान्य केले.