Muslims Demand Ban On The Satanic Verses : ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावर देशात पुन्हा बंदी घाला !

मुसलमानांची मागणी !

(द सॅटनिक व्हर्सेस म्हणजे सैतानाची वाक्ये)

लेखक सलमान रश्दी

नवी देहली – भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक सलमान रश्दी यांचे ‘द सॅटनिक व्हर्सेस’ (सैतानाची वाक्ये) हे पुस्तक भारतात विकता आणि वाचता येऊ शकते. वर्ष १९८७ मध्ये या पुस्तकावर तत्कालीन काँग्रेस सरकारने बंदी घातली होती; मात्र या संदर्भातील कोणतीही अधिकृत कागदपत्रे सरकार देहली उच्च न्यायालयात सादर करू न शकल्याने न्यायालयाने ‘यावर बंदी नाही’, असे म्हटले होते. त्यानंतर आता हे पुस्तक भारतात उपलब्ध होऊ लागले आहे. मात्र आता मुसलमानांनी याला विरोध चालू केला आहे. त्यांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

जमियत उलेमा-ए-हिंदचे उत्तरप्रदेशाचे कायदेशीर सल्लागार मौलाना (इस्लामचा अभ्यासक) काब राशिदी यांनी म्हटले आहे की, या पुस्तकाची विक्री पुन्हा चालू करण्यात आली आहे. या पुस्तकातून इस्लामचा अवमान करण्यात आल्याने पुस्तकाची विक्री मुसलमानांना भडकवण्याचा प्रयत्न आहे. (याचा अर्थ मुसलमानांचा न्यायव्यवस्थेवर, म्हणजेच लोकशाहीवर विश्‍वास नाही, असेच म्हणावे लागेल ! – संपादक) मुसलमान हे सहन करणार नाहीत. या पुस्तकावर पुन्हा बंदी घातली पाहिजे.

मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी ‘कोणताही मुसलमान दुकानात हे पुस्तक पहाणे सहन करणार नाही’, असा धमकीवजा इशारा दिला.

संपादकीय भूमिका

एरव्ही देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवर बोलणारे याविषयी काही बोलतील का ? कि त्यांच्यालेखी केवळ हिंदुविरोधी गोष्टींच्या वेळीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते ?