Jammu Cow Smugglers Arrested : जम्मूमध्ये दंगल भडकवण्यासाठी हिंदूबहुल भागात मेलेल्या गायी फेकणार्‍या ३ मुसलमानांना अटक

अटक करण्यात आलेले आरोपी गोतस्कर

जम्मू (जम्मू-काश्मीर) – गोहत्या करून त्यांना हिंदूंच्या भागांत फेकून दंगल भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ गोतस्करांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी जम्मूच्या नगरोटा येथेही असाच प्रयत्न केला होता. मुख्तियार अहमद, तारिक हुसेन आणि आरिफ अशी पोलिसांनी पकडलेल्या या गोतस्करांची नावे आहेत. हे तिघे अनेक दिवसांपासून गुरांच्या तस्करीत गुंतले होते. गुरांच्या तस्करीसाठी ते ट्रकमध्ये गायींना क्रूरपणे भरत असत. यात मृत झालेल्या गायींना हे तस्कर हिंदूबहुल भागात फेकून देत होते. त्यांनी २४ डिसेंबरला नगरोटा येथील जगती-राजपूर रस्त्यावर मृत गायी फेकल्या होत्या.

मुखतियार हा काश्मीरमधील अनंतनागचा रहिवासी आहे, तर आरिफ आणि तारिक यांचे घर जम्मूच्या रियासी भागात आहे. पोलिसांच्या चौकशीत तिघांनीही गुन्ह्याची स्वीकृती दिली. त्यांचा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की, २ महिन्यांपूर्वीही या तिघांनी मिळून एक मेलेली गाय जगती परिसरात फेकून दिली होती. त्यानंतर संतप्त हिंदूंनी या घटनेचा निषेध केला. गायी फेकून हिंदू-मुसलमान दंगल भडकवायची होती, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

भारतात दंगली कोण आणि का घडवून आणतात, हे यातून लक्षात येते ! ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’ असे म्हणणारे अशा घटनांवर मात्र मौन बाळगतात !