नगर येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड अग्नीकांड प्रकरण
नगर – येथील ६ नोव्हेंबर २०२१ या दिवशी जिल्हा रुग्णालयातील कोविड अतीदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीमध्ये १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्यस्तरीय समितीकडून चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार पोखरणा यांना तोफखाना पोलिसांनी २८ फेब्रुवारी या दिवशी दुपारी अटक केली. तत्पूर्वी डॉ. पोखरणा यांनी जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मागितला होता. तो संमत झाल्यामुळे त्यांना ३ घंट्यांनी सोडण्यात आले. या जळीतकांडप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आता अहवालानुसार डॉ. पोखरणा यांचाही गुन्ह्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.