(म्हणे) ‘देवाने जरी सरकारी भूमीवर अतिक्रमण केले, तरी ते हटवले जाईल !’ – मद्रास उच्च न्यायालय

देवाची संज्ञा कळण्याकरिता साधना आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे.  न्यायालयात देवाची शपथ घेऊन साक्ष-पुरावा घेतला आणि नोंदवला जातो, याचाही विचार केला गेला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

रशियाने उत्तर अटलांटिक महासागरात तैनात केल्या आण्विक पाणबुड्या !

पाश्चात्त्य देशांच्या गुप्तचर संघटना पुतिन यांच्या आण्विक शस्त्रांच्या ताफ्यावर लक्ष ठेवून आहेत.

नाराज रशियन सैनिकांनी स्वतःच्याच कर्नलला रणगाड्याखाली चिरडून मारले ! – पाश्चात्त्य देशांतील अधिकार्‍यांचा दावा

गेल्या मासाभरापासून रशियाच्या युक्रेनविरोधातील सैनिकी कारवाया चालू असूनही त्याला युक्रेनवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. एकूण परिस्थिती पहाता रशियन सैनिकांचे मनोधैर्य खचू लागले आहे, असे म्हटले जात आहे.

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल जगमोहन यांना रोखण्यात येऊन काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या ! – पल्लवी जोशी

आम्ही चित्रपटात कोणतीही चुकीची गोष्ट दाखवलेली नाही. गेल्या ४ वर्षांचे संशोधन आणि काही कायदेशीर कागदपत्रे यांच्या आधारेच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आध्यात्मिक उपचारांवर संशोधन स्वउपचार हाच उपचारांचा शाश्वत प्रकार आहे ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, रामनाथी, गोवा

स्वउपचार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनायला हवा; कारण आपल्या समस्या ज्या शारीरिक किंवा मानसिक वाटतात, त्यांचे मूळ कारण आध्यात्मिक असते आणि त्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांनीच सुटू शकतात.

विदेशात पाठवण्याचे आमीष दाखवून धर्मांधाकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण

विदेशात पाठवण्याचे आमीष दाखवून यासरखान पठाण याने एका हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण केल्यावर त्याच्यासह १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

वेल्लोर (तमिळनाडू) येथे महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार

अशांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

(म्हणे) ‘मुख्यमंत्र्यांनी मागील १० वर्षांत गोमंतकीय चित्रपटांना दिलेल्या आर्थिक साहाय्याचा तपशील घोषित करावा !’ – अमरनाथ पणजीकर, काँग्रेस

काँग्रेसने तिच्या कारकीर्दीत काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांचा वंशविच्छेद करणार्‍या आतंकवाद्यांना मोकळे रान दिले. तीच काँग्रेस आता सत्य घटनांवर आधारित काश्मिरी पंडितांवरील चित्रपट करमुक्त केल्यावर थयथयाट करत आहे. हा निर्दयीपणा हिंदूंनी लक्षात ठेवावा !

कागदाच्या टंचाईमुळे श्रीलंकेतील २ प्रमुख दैनिक बंद !

श्रीलंकेत सध्या विदेशी चलनाच्या गंगाजळीची प्रचंड टंचाई निर्माण झाल्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच कागदांच्या टंचाईमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षाच रहित करण्यात आल्या होत्या.

नवाब मलिक यांची पाठराखण केल्यामुळे भाषण अर्ध्यावर सोडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांचा सभात्याग !

विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न दिल्याने भाजपच्या आमदारांनी २५ मार्च या दिवशी सभात्याग केला.