भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जाते ! – अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देवगड तालुक्यातील खुडी गावातील श्री देवी हेदुबाई मंदिरामध्ये २३ मार्च या दिवशी ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी अधिवक्त्या (सौ.) राणे यांनी मार्गदर्शन केले.

माजी आय.पी.एस्. अधिकारी रवींद्र पाटील यांनी अवैध मार्गाने २४० बिटकॉईन घेतले !

माजी आय.पी.एस्. अधिकारी रवींद्र पाटील यांनी कह्यात घेतलेल्या आरोपींकडील माहितीचा अपलाभ घेऊन २४० बिटकॉईन घेतल्याची माहिती अन्वेषणामध्ये समोर आली आहे.

आशासेविकांच्या मानधनात ५०० रुपयांची वाढ करणार !  – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाकाळात आशासेविकांनी केलेले काम लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येत आहे. यांसह राज्यस्तरावर चांगले काम करणार्‍या आशाप्रवर्तकाला १ लाख, तर आशासेविकेला ७५ सहस्र रुपये पारितोषिक देण्यात येईल.

शाळांमधून भगवद्गीता शिकवण्यास शासनाने अनुमती द्यावी ! – राम कदम, आमदार, भाजप

देशातील छोट्यातील छोटी न्यायपालिका आणि सर्वाेच्च न्यायपालिका यांचे कामकाज जर भगवद्गीतेची साक्ष घेऊन चालू होत असेल, तर भगवद्गीतेच्या शिक्षणाला सरकार विरोध का करत आहे ?

वाहतूक पोलीस जनतेकडून करत असलेल्या पैसे वसुलीची गृहविभागाने गांभीर्याने नोंद घ्यावी !

चौकात पैसे वसूल करणारा वाहतूक पोलीस छोटा असतो; पण त्याच्या डोक्यावरचे (वरिष्ठ) पोलीस निरीक्षक किंवा सर्कल अधिकारी यांच्याकडे आपण पहात नाही. पोलिसांचे स्थानांतर करण्यासाठी दिलेले पैसे वसूल करण्यासाठी हे सर्व प्रकार केले जातात.

भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांविषयी सरकारकडून समाधानकारक उत्तरे नाहीत ! – देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्या विरोधात ‘ईडी’ने कारवाई केल्यानंतर याविषयी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी विधानसभेत चकार शब्दही काढला नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाची ४१० मिनिटे वाया; २ कोटी ८८ लाख रुपयांची हानी !

सत्ताधारी आणि विरोधक यांनी वाया गेलेला वेळ आणि आर्थिक हानी यांचा गांभीर्याने विचार करायला हवा !

भ्रष्टाचार्‍यांना निवृत्तीवेतन कशासाठी ?

कोट्यवधी रुपयांचा व्यय करणारे, निवडून आल्यावर भ्रष्ट मार्गाने कोट्यवधी रुपयांची माया जमवणारे अशांना निवृत्तीवेतन का आणि कशाकरता द्यायचे ? याविषयी कधीतरी विचारमंथन होणे आवश्यक आहे.

बंगालमध्ये लोकशाही आहे का ?

बीरभूम (बंगाल) येथे पोलिसांनी २०० हून अधिक गावठी बाँब जप्त केले आहेत. तसेच राज्यातील पश्चिम बर्दवान जिल्ह्यातील सालानपूरमध्ये पोलिसांनी शस्त्रे बनवणार्‍या कारखान्यावर धाड टाकून मोठ्या संख्येने बाँब जप्त केले.

श्रीगुरूंची आज्ञा म्हणून घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करणार्‍या पुणे जिल्ह्यातील साधिका

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम