रशियाने उत्तर अटलांटिक महासागरात तैनात केल्या आण्विक पाणबुड्या !

मॉस्को (रशिया) – पाश्चात्त्य देशांना धमकावल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी उत्तर अटलांटिक महासागरात रशियन आण्विक पाणबुड्या तैनात केल्या आहेत. या पाणबुड्या १६ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत. पाश्चात्त्य देशांच्या गुप्तचर संघटना पुतिन यांच्या आण्विक शस्त्रांच्या ताफ्यावर लक्ष ठेवून आहेत.