पाल खुर्द (वेल्हे, जि. पुणे) येथील शिवरायांच्या शिवापट्टणवाडा स्थळाच्या उत्खननामध्ये शिवकालीन अवशेष सापडले !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द येथील शिवरायांच्या शिवापट्टणवाडा स्थळाच्या उत्खननामध्ये शिवकालीन बांधकामाचे अवशेष सापडले आहेत.

फायनान्स आस्थापनांकडून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले जातील ! – शंभुराज देसाई

नागरिकांची लुबाडणूक करणार्‍या राज्यातील फायनान्स आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याची सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

केंद्रीय यंत्रणांच्या नावाने राज्यातील प्रशासकीय यंत्रणा वसुलीचे षड्यंत्र रचत असल्यास चौकशी करणार ! – गृहमंत्री

केंद्रीय यंत्रणांच्या नावाने ‘वसुली’चे षड्यंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना ? अशी शंका निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे उपस्थित होत आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते आमदार तथा अधिवक्ता आशिष शेलार यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत केली.

‘क्वाड’ देशांत भारत अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी ! – अमेरिका

अमेरिकेशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांच्या संदर्भात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. ‘क्वाड’ देशांत भारत आमचा महत्त्वाचा सहकारी आहे, असे विधान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी केले.

भारत अमेरिकेच्या रशियाविरोधी भूमिकेला जुमानत नाही !

‘रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन एक मास उलटला असला आणि भारतावर पाश्चात्त्य देश अन् विशेषकरून अमेरिका यांच्याकडून रशियाच्या विरोधात भूमिका घेण्याचा दबाव आणला जात असला, तरी भारत याला जुमानत नाही. भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांवर विशेष विपरीत परिणाम होणार नाहीत’, असे या लेखात म्हटले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त ! – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

आर्थिक घोटाळे अनेक अधिकारी एकमेकांच्या संगनमताने करतात. हेही उघड होत आहे. त्यामुळे आघाडीतील तिन्ही पक्ष आणि भाजप हे अपकीर्त होत आहेत.

शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी तारकर्लीच्या सरपंच सौ. स्नेहा केरकर यांच्यावर गुन्हा नोंद

जनता लोकप्रतिनिधींचा आदर्श घेत असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे अशाप्रकारचे वर्तन जनतेला कोणता आदर्श देणार ? हा प्रश्‍नच आहे !

३१ मार्चपासून देशात कोरोनाचे निर्बंध रहित होणार ! – केंद्र सरकार

कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र मुखपट्टी (मास्क) आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे नियम कायम असणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘निरक्षराने ‘सर्व भाषांतील अक्षरे सारखीच असतात’, असे म्हणणे, जसे म्हणणार्‍याचे अज्ञान दाखवते, त्याचप्रमाणे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे त्यांचे अज्ञान दाखवतात. ‘सर्व औषधे, सर्व कायदे सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे आहे.’