रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाचे प्रतिरूप असणार्या पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांच्या घरी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि सिंगबाळ कुटुंबातील व्यक्तींची जाणवलेली भाववैशिष्ट्ये !
फोंडा, गोवा येथील पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांच्या घरातील श्री गणेश आणि श्री अन्नपूर्णामाता यांच्या मूर्ती पालटून नवीन मूर्ती स्थापन केल्या. तेव्हा पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांची पूजा केली. त्यानंतर ७.२.२०२२ या रथसप्तमीच्या दिवशी आम्हा काही साधकांना त्या मूर्तींचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.