(‘क्वाड’ देश – भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान)
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांच्या संदर्भात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. ‘क्वाड’ देशांत भारत आमचा महत्त्वाचा सहकारी आहे, असे विधान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी केले.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात भारताची भूमिका डळमळीत आहे’, असे विधान केले होते. यासह अमेरिका, ‘नाटो’ (नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन), तसेच युरोपीय देश यांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतरही भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता अमेरिकेने वरील भूमिका घेतली आहे.