वेल्हे (पुणे) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द येथील शिवरायांच्या शिवापट्टणवाडा स्थळाच्या उत्खननामध्ये शिवकालीन बांधकामाचे अवशेष सापडले आहेत, तसेच खोदकामात बहामणी काळातील एक नाणे, मोठ्या दगडांचा पाया, मातीच्या विटांचे बांधकाम, उखळ, जुन्या मातीच्या भांड्यांचे अवशेष सापडले आहेत. गुंजवणी नदीच्या तिरावरील छत्रपती शिवरायांच्या पत्नी महाराणी सईबाई यांच्या समाधी स्थळाचेही खोदकाम चालू आहे. या दोन्ही ठिकाणी पर्यटकांना फिरण्यास मनाई करण्यात येत आहे. तसा आदेश भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिला आहे. पुरातत्व खात्याच्या तंत्रज्ञ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली खोदकाम करणार्या कामगारांना सकाळी ८ ते सायंकाळ ५ पर्यंत या परिसरात काम करता येणार आहे. त्यानंतर या परिसरामध्ये सर्वांना प्रतिबंध करण्यात आला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू, तसेच ऐवज यांना कोणत्याही प्रकारची हानी पोचू नये याकरता खोदकाम चालू असतांना हा परिसर पर्यटक, तसेच स्थानिकांना बंद करण्यात आला आहे.
सौजन्य साम टीव्ही