इस्रायली पंतप्रधान बेनेट यांचा एप्रिलमध्ये भारत दौरा !

पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असून यामध्ये रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे पालटत असलेली भूराजकीय समीकरणे, तसेच उभय देशांमधील संबंधांना नव्या स्तरांवर घेऊन जाण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलणे, हा या दौर्‍याचा उद्देश असेल.

रशियाकडून मरियुपोल शहरातील तब्बल ९० टक्के इमारतींवर आक्रमण !

मरियुपोल शहर रशियाकडे कह्यात देण्याविषयी रशियाने दिलेला निर्वाणीचा इशारा युक्रेनने धुडकावला. ‘आम्ही आत्मसमर्पण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे युक्रेनने सुनावले आहे.

ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांची ‘ईडी’कडून चौकशी !

‘ईडी’ला बॅनर्जी यांच्याशी संबंधित पुरावे मिळाल्याने त्यांची अन् त्यांची पत्नी यांची चौकशी केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

आता ‘गोवा इन्क्विझिशन’वर आधारित ‘द गोवा फाइल्स’ चित्रपटाची निर्मिती व्हावी ! – प्रा. सुभाष वेलींगकर, हिंदुत्वनिष्ठ

३२ वर्षांपूर्वी काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला होता. त्या वेळी काँग्रेसधार्जिण्या विचारधारेमुळे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फुटली नाही.

होळीला ‘पाणी वाचवा’चे आवाहन करणे, तर बकरी ईदला मटणावर चर्चा करणे, हा आमचा मूर्खपणा होता ! – अभिनेत्री शर्लिन चोप्रा

होळीच्या वेळी अभिनेत्री काजोल यांनी ‘पाणी वाचवा’, असे आवाहन करणारा एक व्हिडिओ नुकताच प्रसारित केला होता. त्यावर शर्लिन चोप्रा यांनी ट्वीटने असे उत्तर दिले !

होळी हा व्यक्तीतील दुष्प्रवृत्ती आणि अमंगल यांचा नाश करून सन्मार्ग दाखवणारा सण ! – सौ. इप्शिता पटनायक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होळीनिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते, याचा लाभ पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत, तसेच नेपाळ येथील जिज्ञासूंनी घेतला.

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ

नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्याशी निगडित आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मलिक हे आधी ‘ईडी’ कोठडीत आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते.

न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात बंद पाळणार्‍या संघटनांवर न्यायालयाचा अवमान केल्यावरून कारवाई करण्याची मागणी

हिजाबच्या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला राज्यात बंद पाळून विरोध करण्यात आला. हा न्यायालयाचा अवमान असल्यावरून बंदचे आवाहन करणार्‍या संघटनांच्या विरोधात २ याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता दक्षिण भारतातील मुसलमानांवर लक्ष केंद्रित करणार !

दक्षिण भारतात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वाढत्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी संघाकडून ही योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये दक्षिण भारतात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रसार वाढवणे हे एक उद्दिष्ट असणार आहे.

वाराणसी येथील १२६ वर्षीय योगगुरु स्वामी शिवानंद यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान !

वाराणसी येथील १२६ वर्षीय स्वामी शिवानंद यांना २१ मार्च या दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आला.