‘द कश्मीर फाइल्स’ प्रत्येक भारतियाने बघायला हवा ! – आमीर खान, अभिनेते

चित्रपटाला सर्व स्तरांतून भरभरून प्रतिसाद मिळाल्यावर आमीर खान जागे झाले का ?

आय.पी.एल्.चे क्रिकेट सामने मुंबई येथे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने घ्यावेत ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

भाजपचे सदस्य आशिष शेलार यांनी क्रीडा विभागाविषयी बोलतांना आगामी ‘आय.पी.एल्.’चे क्रिकेट सामने मुंबई येथे २५ ऐवजी ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने होण्यासाठी क्रीडामंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.

राज्यात ३ वर्षांत विजेचा धक्का लागून ९५५ लोकांचा मृत्यू ! – नितीन राऊत, ऊर्जामंत्री

ते पुढे म्हणाले की, विजेचा धक्का लागून मरण पावलेल्या नागरिकांपैकी ३०२ व्यक्तींच्या वारसांना हानीभरपाई देण्यात आली आहे.

रायगडमधील ‘सेझ’साठी घेतलेल्या भूमींची सुनावणी ३ मासांत पूर्ण  करणार ! – सुभाष देसाई, उद्योगमंत्री

‘महामुंबई सेझ’ आस्थापनासाठी उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १ सहस्र ५०४ हेक्टर भूमी शासनाने संपादीत केली होती. प्रत्यक्ष प्रकल्प न झाल्याने ही भूमी शेतकर्‍यांना परत करण्यात यावी’, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.

बीड नगरपालिकेच्या ४ अधिकार्‍यांचे निलंबन !

राहुल टाकले, योगेश हांडे, सुधीर जाधव आणि सलीम सय्यद याकूब अशी निलंबित अधिकार्‍यांची नावे आहेत. आमदार विनायक मेटे यांची बीड येथील नगरपालिकेच्या विविध प्रश्नांवरील लक्षवेधी २१ मार्च या दिवशी विधान परिषदेत चर्चेला येणार होती.

भाजपच्या सत्ताकाळात राबवलेल्या ‘प्रज्ज्वला’ योजनेची महाविकास आघाडी करणार चौकशी !

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, वर्ष २०१९-२० मध्ये ‘प्रज्ज्वला’ योजनेसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही योजना राबवतांना शासनाच्या कार्यपद्धतीचे पालन करण्यात आले नाही.

राज्यातील धान उत्पादकांना थकित ६०० कोटी रुपये देणार ! – उपमुख्यमंत्री

राज्यातील धान उत्पादकांसाठी आधारभूत किमतीसाठी थकित असलेले ६०० कोटी रुपये देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.

अनुदानित मागासवर्गीय वसतीगृहातील अंशकालीन पदवीधर अधीक्षकांसह कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत घेणार नाही ! – धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री

धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘शासनाच्या शपथनाम्यानुसार अनुदानित अंशकालीन कर्मचार्‍यांना १० टक्के आरक्षणासह त्यांची वयोमर्यादा ५५ करण्याविषयी शासनस्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.’’

आम्हाला मते न देणार्‍यांनी आमच्याकडे साहाय्याच्या मागणीसाठीही येऊ नये !

‘ज्या लोकांनी आम्हाला मतदान केले नाही, त्यांनी आमच्याकडे साहाय्याची मागणी करण्यासाठी येऊ नये. ज्यांनी आम्हाला मते दिली, त्यांनाच आम्ही साहाय्य करणार आहोत, असे विधान हैदरगड मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार दिनेश रावत यांनी केले.

म्हाडाची अनुमती न घेता नाशिक महापालिकेने दिल्या गृहनिर्माण योजनेला अनुमती, कोट्यवधींच्या घोटाळ्याची शक्यता !

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची चौकशीची घोषणा !